Posts

अत्तराचा फाया!

अत्तर म्हटलं की मला लहानपणीचे दिवस आठवतात. दिवाळीच्या दिवशी दादांनी आणलेल्या अत्तराचा फाया मनगटावर फासला जायचा. तो सुगंध मनांत साठवत दिवाळीचा सण उत्साहात पार पडायचा. गॅलरीत हवेवर लहरणारा कंदील पाहत आणि तळमजल्याला जाऊन  फटाके लावण्यात बालमनाला मौज वाटायची. थोडे मोठे झाल्यावर आई वडिलांबरोबर लग्नाला जातांना अत्तर लावायला मिळायचं. स्वतःला सुगंध जाणवला की खुश होत लग्नात आनंदाने इकडे तिकडे फिरण्यात मजा यायची. कॉलेजमध्ये अत्तराचा छंद जोपासता आला नाही .नोकरीला  लागल्यावर मात्र अत्तराचा फाया फासून नाहीतर परफ्यूमचा फवारा मारून बाहेर पडायला लागलो. छान वाटायचं.  पुढे बँकेत काम करतांना नामांकित S.H.Kelkar Co. तर्फे आम्हां दिवाळीत अत्तराची कुपी/छोटी बाटली  भेट मिळू लागली. त्यामुळे अत्तराची आवड निवड पुढे चालूच  राहिली. मला स्वतःला Eau De Colonge हा परफ्यूम फार आवडतो. ह्याचा मंद, संयमी सुगंध मला भावविभोर करून टाकतो. १७०९ जर्मनी मध्ये बनवलेला हा परफ्यूम Cologne ह्या शहराचे लेबल घेऊन जगप्रसिद्ध झाला. तुम्हाला कोणता परफ्यूम/अत्तर आवडतं, सांगाल का? नंतर कविता आणि शेरोशायरीचा संबंध ...

पुन्हा एकदा कविता

फिर्याद फिर एक बार कत्ल हुआ पर दर्द का एहसास नही ऐ खुदा किससे   पाला पडा है आप को तो कुछ खबर ही नही !   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~   हमदर्द माना के ये दर्द गहरा है लेकिन लगता सूनहरा है पता है के ये सयाना नही पर क्या करे हमारा अपना है !   ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~   निवृत्त  - एक व्यथा वयाची साठी ओलांडली की ऑफिसला रामराम ठोकुन चुपचाप घरी बसायचं पदरात पडलेल्या पेन्शनवर संथपणे   गुजराण करत राहायचं मन आणि शरीर पांगळे करणारे आजार अटीतटीने दुर भिरकावत गृहविष्णुच्या साच्यात स्वत : ला ढासळवत जगत राहायचं पुढच्या पिढीला रोबोटसारखी साथ देत निमुटपणे ( दिलेली ) functions पार पाडत राहायचं देवालाही वेळ नसतो तुमची निवृत्तांची गाऱ्हाणी ऐकायला ........ त्याच्यापुढे प्रचंड जनसमुदाय असतो काम करुन कौल मागणारा !   ~~~~~~~~~...

कविता

  माझ्यातला कोमात गेलेला कवी कधी कधी जागा होतो आणि मी काही ओळी लिहून जातो .. काही वेगळ्या   मुडमधल्या कविता पोस्ट करत आहे.   वाचणार असाल तर आनंद आहे आणि अभिप्राय   देणार असाल तर आभारी आहे.   प्रश्न मी तुला पाहणार तू नाही पाहणार हे असे किती दिवस चालणार काळ्या फिती लावून तुझ्या घरावरून कितीदां जाणार --------------------------- फितुर अचानक समोर आलीस मग मी शब्द शोधू लागलो मनात डोकावलं तर काय बेटे आधीच पसार झाले होते कल्पना नव्हती की शब्द तुला फितुर होतील !   --------------------------   पाऊस झाडांच्या फांद्याबरोबर हिंदकळणारे माझे मन थंडगार पाऊस शिडकाव्यानं शहारून उठलं आहे. मनांत लपून बसलेली तु या श्रावणधारासारखीच आठवणींच्या आकाशात सारखी ये जा करते आहेस कौलावरून धावत येणारे मोती ओंजळीत धरून ठेवण्यासाठी घराच्या वळईतुन अंगणात मी सारखा येरझारा घालतो आहे खळ्यातल्या मातीला आवेगाने आलिगन देणाऱ्या या पाऊसधारा तुझ्या पडवीत येऊन तुलाही...
Image
  " बम्बई तो बहुत दूर है " एअर इंडियावाल्या   आम्हां कुटुंबीयांना दर वर्षी विमान प्रवासाचे वेध लागायचे . बरं , जाऊन - जाऊन जाणार कुठे तर कलकत्ता , मद्रास किंवा दिल्ली ! कारण भारतात फक्त या तीन शहरांतच एअर इंडियाची विमानं जायची . त्यात दिल्ली शहरासाठी फ्री पास मिळवण्यासाठी स्टाफची चढाओढ असायची . कंपनीतल्या एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या स्टाफमधून फ्री पास मिळवण्यासाठी काय खटपटी - लटपटी करायला लागायच्या , ते माझ्यासारख्या शाळकरी मुलाला काय कळणार ? त्यामुळे कधीमधी मी दादांनविचारायचो " आता विमानाने कधी जायचं ?" एके दिवशी कामावरून परतल्यावर दादांनी जाहीर केलं की पुढच्या आठवड्या त मला आणि माझ्या धाकट्या बहिणीला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी त्यांना फ्री पास मिळाला आहे . तेव्हा आम्हां दोघां भावंडांना पुन्हा एकदा विमानात बसायला मिळणार याची गंमत वाटली आणि खूप आनंद झाला . ठरल्या दिवशी आम्ही चर्नी रोड – सांताक्रुझ असा रेल्वे प्रवास करून सांताक्रुझ एअरपोर्टला दाखल झालो . ...
Image
  वेडात पोदारवाले निघाले साथ !! 😎 आम्हां पोदार कॉलेजवाल्यांना महिना - दोन महिन्यांनी कुठेतरी हाईकला जायची खुमखुमी यायची . तर तो काळ होता १९७५ चा , डिसेंबर महिना . आमच्या ग्रुप लीडर विवेकने ठरवलं की यावेळी चौक - कर्जत परिसरातल्या इर्शाळ गडावर हाईकला जायचं . हाईकला जाणं आमच्यासाठी नवीन नव्हतं , पण यावेळी थोडा हटके प्लॅन होता – आदल्या दिवशी दुपारी चढाई सुरू करून संध्याकाळपर्यंत शिखर गाठायचं , रात्री तिथंच मुक्काम करायचा , आणि दुसऱ्या दिवशी परत मुंबईला . असं काही करण्याचं आम्ही आधी कधी ठरवलं नव्हतं – त्यामुळे उत्साह भरपूर आणि थोडी धडधडही . शनिवारी आम्ही सहाजण आधी लोकलने कर्जत , आणि तिथून एस . टी . ने चौक गाव गाठलं . गावाच्या मागे ताठ उभा असलेला इर्शाळचा डोंगर नजरेला पडला – आणि मनात एक विचार झरकन चमकून गेला , " हीच ती जागा , जिथे आज रात्री मुक्काम करायचा आहे ."  हळू हळू चालत , थोडंसं खाऊन आम्ही इर्शाळकडे निघालो . सुमारे १२०० फूट उंचीचा हा गड जरा त्रासदायक वाटणार ...