माझ्या काही कविता
तुम्हा वाचकांच्या आग्रहाला मान देऊन मी दोन कविता आपणापुढे सादर करीत आहे , पहिली कविता "सागर किनारी" जी १९७४ मध्ये रेडिओवर वाचली होती आणि दुसरी आहे “ घर ” जी नोव्हेंबर १९७७ मध्ये प्रसिद्ध झाली होती . सागर किनारी निऑन साईंनची चमक काळोखाची पार्श्वभूमी खारा भणभणता वारा सळसळणारे समुद्रजल फडफडणारी दिवटी धडधडणारा उर खदखदणारा अंधार हिरमुसलेला प्रकाश टिळकांचा पुतळा अपुरा उजेड चबुतऱ्याजवळ कबुतरे निर्मळ दूरवर समुद्रात मिणमिणारी होडी उसळ्या मारणाऱ्या लाटा खोलवर डुचमळणाऱ्या सावल्या हळुवार गुंफणारे नाते थरथरते मऊ वाळूत ती लाजते , नजर सावरते गुंफते , हात , हातात घर या आकाशाच्या पंखांना आधार देत माझ्या आसवांचे मी बांधायला सांगितले होते एक घर , एक दार ! ज्याला सीमा नसतील ज्याला आकार नसेल ज्याला रंग नसेल असे अस्पर्शित अपश्यत ! पण मिळाले , काय तर दुःखांच्या सीमांनी मर्यादित निराशेच्या भुतांनी व्यापलेलं आणि उदासीनतेच्या रंगाने न्हालेलं हे हाडा-मासाचे घर ! ह...