Posts

Showing posts from November, 2025

अत्तराचा फाया!

अत्तर म्हटलं की मला लहानपणीचे दिवस आठवतात. दिवाळीच्या दिवशी दादांनी आणलेल्या अत्तराचा फाया मनगटावर फासला जायचा. तो सुगंध मनांत साठवत दिवाळीचा सण उत्साहात पार पडायचा. गॅलरीत हवेवर लहरणारा कंदील पाहत आणि तळमजल्याला जाऊन  फटाके लावण्यात बालमनाला मौज वाटायची. थोडे मोठे झाल्यावर आई वडिलांबरोबर लग्नाला जातांना अत्तर लावायला मिळायचं. स्वतःला सुगंध जाणवला की खुश होत लग्नात आनंदाने इकडे तिकडे फिरण्यात मजा यायची. कॉलेजमध्ये अत्तराचा छंद जोपासता आला नाही .नोकरीला  लागल्यावर मात्र अत्तराचा फाया फासून नाहीतर परफ्यूमचा फवारा मारून बाहेर पडायला लागलो. छान वाटायचं.  पुढे बँकेत काम करतांना नामांकित S.H.Kelkar Co. तर्फे आम्हां दिवाळीत अत्तराची कुपी/छोटी बाटली  भेट मिळू लागली. त्यामुळे अत्तराची आवड निवड पुढे चालूच  राहिली. मला स्वतःला Eau De Colonge हा परफ्यूम फार आवडतो. ह्याचा मंद, संयमी सुगंध मला भावविभोर करून टाकतो. १७०९ जर्मनी मध्ये बनवलेला हा परफ्यूम Cologne ह्या शहराचे लेबल घेऊन जगप्रसिद्ध झाला. तुम्हाला कोणता परफ्यूम/अत्तर आवडतं, सांगाल का? नंतर कविता आणि शेरोशायरीचा संबंध ...