Posts

Showing posts from August, 2024

अफगाण स्नो

  माझ्या लहानपणी आमच्या घरी   " अफगाण स्नो " एक क्रीम वापललं जायचं . ते त्या काळातलं  फेशियल क्रिम  होतं बहुतेक .  कमाल म्हणजे ते पुरुष आणि स्रिया कोणीही वापरु शकत होतं . फेस पावडर लावायच्या आधी ते लावलं जायचं . स्नो लावुन झाल्यावर पावडरीचा पफ गालावरुन फिरवला जायचा . आणि मग रुबाबात बाहेर पडायचं असा तो फंडा होता .   त्या अफगाण स्नो ची बाटली फार सुंदर दिसायची .  निळ्या रंगाची बाटली असायची आणि   त्यावर निळ्या पांढर्‍या रंगातलं हिमालयातल्या स्नो चं चित्र असायचं .  शालेय जीवनांतलं ते एक आकर्षण होतं . मोठ्यांकडे स्नो चा  हट्ट धरला तर सपशेल नकार मिळायचा . अगदीच रडकुंडीला आलो तर गंध लावल्यासारखं गालाला स्नो लावुन आमची बोळवण व्हायची . पण त्याचा गंध आणि गारवा खुप सुखावुन जायचा . लहानपणी हाती न पडणारा अफगाण स्नो मोठा झाल्यावर मोठी बाटली खरेदी करुन मनसोक्त फासायचा असे   मनांत मांडे मांंडायचो .  पण मोठेपणी हातात पैसे येऊ लागल्यावर...