धन्य धन्य हो प्रदक्षिणा .....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ३०० वर्षे पुर्ण होत असल्याबद्दल २९ ते ३१ मार्च १९८० या दरम्यान रायगडावर होऊ घातलेला समारंभाची / कार्यक्रमाची वर्तमानपत्रांतुन , रेडिओवरुन आणि टि . व्ही . वरुन जोरात चर्चा आणि जाहिरात सुरु झाली होती . कार्यक्रमासाठी त्या वेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी रायगडला भेट देणार होत्या . त्या निमित्ताने मुंबईतील एका गिर्यारोहक संघाने (Hikers Group) रायगडला प्रदक्षिणा घालायची स्पर्धा जाहिर केली होती . अजुन पर्यंत ४ - ५ वेळा रायगड चढुन गेलो होतो त्यामुळे किल्ला माझ्यासाठी अनोळखी नव्हता . परंतु या वेळी किल्ल्याला प्रदक्षिणा घालत चोहो बाजुनी न्याहाळता येणार होते ही माझ्यासाठी पर्वणी होती . ही संधी साधायची असं मी पक्क ठरवलं . ...