कविता
माझ्यातला कोमात गेलेला कवी कधी कधी जागा होतो आणि मी काही ओळी लिहून जातो .. काही वेगळ्या मुडमधल्या कविता पोस्ट करत आहे. वाचणार असाल तर आनंद आहे आणि अभिप्राय देणार असाल तर आभारी आहे. प्रश्न मी तुला पाहणार तू नाही पाहणार हे असे किती दिवस चालणार काळ्या फिती लावून तुझ्या घरावरून कितीदां जाणार --------------------------- फितुर अचानक समोर आलीस मग मी शब्द शोधू लागलो मनात डोकावलं तर काय बेटे आधीच पसार झाले होते कल्पना नव्हती की शब्द तुला फितुर होतील ! -------------------------- पाऊस झाडांच्या फांद्याबरोबर हिंदकळणारे माझे मन थंडगार पाऊस शिडकाव्यानं शहारून उठलं आहे. मनांत लपून बसलेली तु या श्रावणधारासारखीच आठवणींच्या आकाशात सारखी ये जा करते आहेस कौलावरून धावत येणारे मोती ओंजळीत धरून ठेवण्यासाठी घराच्या वळईतुन अंगणात मी सारखा येरझारा घालतो आहे खळ्यातल्या मातीला आवेगाने आलिगन देणाऱ्या या पाऊसधारा तुझ्या पडवीत येऊन तुलाही...