Posts

Showing posts from September, 2024

कृपा महाराजाची - एक दिवसात भेट कलकत्त्या

Image
  || कृपा महाराजाची || || एक दिवसात भेट कलकत्त्याची || दादा एअर इंडियात नोकरीला होते. त्यामुळे दर वर्षी   आम्हांला दोन माणसांसाठी   फ्री पास मिळायचा.   एका वर्षी कलकत्त्याला भेट द्यायची असं   दादांनी ठरवलं. त्यांनी दोन तीन वेळा   संबंधित  विभागाशी बोलुन जायचा दिवस ठरवायचा प्रयत्न केला. पण कलकत्ता फ्लाईट स नेहमी फुल  असायच्या आणि कर्मचार्‍यांसाठी साठी सीट्स उपलब्ध   होत नव्हत्या. मला वाटतं त्या वर्षी अनेक कर्मचाऱ्यांना कलकत्त्याला जायला मिळत नव्हतं.त्यामुळे त्या वर्षी   अशा कर्मचार्‍यांसाठी एअर इंडियाने एक अफलातुन निर्णय घेतला.त्यांनी कलकत्त्याला जाण्यासाठी फक्त कर्मचार्‍यांसाठी एक स्पेशल विमान सोडायचं ठरवलं. अट एकच होती कि विमान एके दिवशी सकाळी   कलकत्त्याला जाईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी परत येईल. त्या वर्षीचा फ्री पास   फुकट जाऊ नये म्हणुन  बऱ्याच  कर्मचार्‍यांनी त्या फ्लाईटचं बुकींग केलं. अर्थात माझे दादा काही त्याला अपवाद नव्हते. मग एके दिवशी सकाळी दादा आणि मी त्या स्पेशल विमानाने कलकत्त्...

अफगाण चर्च

Image
लहानपणी संध्याकाळी दादांबरोबर (वडिलांना आम्ही दादा म्हणायचो) फिरायला जायला मिळणं दुरापास्त होतं. पण जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हाआम्ही गिरगांव चौपाटीवर फिरायला जायचो. मफतलाल स्विमींग क्लबच्या बाजुची चौपाटी माझी आवडती होती. सुर्यास्ताला काही अवधी असतांना आम्ही पोहोचायचो. समोर समुद्रावर नजर फिरवततांना उजवीकडे मलबार हिलची झाडी आणि बिल्डिंग्ज दिसायच्या तर डावीकडे नरीमन पाॅईंट च्या बिल्डिंग्ज दिसायच्या. त्या बिल्डिंगच्या कोंडाळ्यात एक टोकदार मनोरा आकाशात झेपावलेला दिसायचा. मला त्या टोकदार मनोर्‍याबद्दल सतत कुतुहल वाटायचं. मग एकदा विचारलंच दादांना. ते म्हणाले "अरे , ते अफगाण चर्च आहे" . मला गिरगांव चर्च माहित होतं. अफगाण चर्च नांव ऐकल्यावर मला त्या नावांबद्दल कुतुहल वाटलं , पण त्या काळी वडिलांना जास्त प्रश्र विचारता येत नसत. त्यामुळे ते चर्चं माझ्यासाठी कोडंच राहिलं. पुढे एकटा किंवा मित्राबरोबर मरीन ड्राईव्हवर फिरतांना तो सुळक्यासारखा आकाशांत   घुसलेला मनोरा नजरेस पडायचा पण तेव्हा कधी सुचलं नाही की त्या चर्चचा शोध घ्यायला जावं. तो शोध घ्यायचा योग ४-५ वर्षापुर्वी आला. ...