Posts

Showing posts from February, 2025

आसातु अर्थात आदिम साहित्य तुषार

Image
       पोदार कॉलेजमधल्या काही उत्साही कवी-कवयित्रींनी मिळुन काव्यवाचनासाठी एक व्यासपीठ सुरु करायचं ठरवलं. वर्ष होतं १९७३! मग जमायचं कुठे हा प्रश्र उभा राहिला. कॉलेजमध्ये एखादा वर्ग मिळवुन महिन्यांतुन एकदा जमायचं आधी ठरलं, पण कॉलेजमधल्या वर्गाचं भाडं परवडणारं नव्हतं. तेव्हा एखाद्या शाळेच्या वर्गात जमायची कल्पना पुढे आली. त्यावेळी रवि भगवतेने बालमोहन विद्यामंदिर शाळेत चौकशी केली. त्याच शाळेत शिकला असल्यामुळे त्याने नाममात्र भाड्यावर दर महिन्याला एक वर्ग भेटायला मिळेल अशी व्यवस्था केली. या व्यासपीठाला काय नांव द्यायचं या वर बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी आदिम संस्थेची संबंधित नांव ठेवलं गेलं – आदिम साहित्य तुषार!      या आसातुची पहिली मिटिंग २१ऑक्टोबर १९७३ रोजी बालमोहन विद्यामंदिर मध्ये संध्याकाळी ५-३० वाजता झाली. प्रारंभी फक्त कवी आपल्या स्व-रचित कविता वाचायचे. नंतर लघुकथा, कथा, एकांकिका आणि चारोळ्या वाचन सुरु झालं. सर्व साहित्य स्व-रचित असल्यामुळे वाचणार्‍यांचा आणि ऐकणार्‍यांचा उत्साह ओसंडुन वाहायचा. लेखन आवडलं असल्यास श्रोत्यांकडुन उस्फुर्त दाद मिळाय...