भारतातील पहिला फ्लोटिंग बँक काउंटर
एका राष्ट्रीयकृत बँकेचं अपॉइंटमेंट लेटर घरी आलं आणि मी हरखुन गेलो . बी . कॉम . झाल्यापासुन बँकेतच नोकरी करायची असं स्वप्न बघत होतो . त्यामुळे अस्मादिक खुश ! त्या काळी पोस्टिंग कुठे असणार ते सेंट्रल ऑफिसला पर्सोनेल डिपार्टमेंटला गेल्यावरच कळायचं . मग पोस्टिंगच लेटर घ्यायला नरीमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये एप्रिल १९७५ मध्ये डेरेदाखल झालो . फोर्ट ब्रँच मध्ये तुझं पोस्टिंग असं मला त्या पर्सोनेल ऑफिसरने सांगितलं आणि एक एनव्हलप् माझ्या हाती सोपवला . मी एनव्हलप् उघडुन पाहिलं तर माझं एका एक्सटेंशन काऊंटरवर पोस्टिंग झलं होतं , नांव होतं I.N.S.XXX! ते वाचुन मला काहीच अर्थबोध झाला नाही . नंतर फोर्ट ब्रँचला गेल्यावर त्याचा उलगडा झाला . एका नौदलाच्या बोटीवर बँकेने काऊंटर उघडला होता आणि आम्हां स्टाफला त्या बोटीवर जाऊन बँकिग सेवा द्यायची होती . हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं . मी रुजु झालो तेव्हा ती बोट डॉक...