अफगाण स्नो

 

माझ्या लहानपणी आमच्या घरी  "अफगाण स्नो " एक क्रीम वापललं जायचं.ते त्या काळातलं फेशियल क्रिम होतं बहुतेककमाल म्हणजे ते पुरुष आणि स्रिया कोणीही वापरु शकत होतं. फेस पावडर लावायच्या आधी ते लावलं जायचं. स्नो लावुन झाल्यावर पावडरीचा पफ गालावरुन फिरवला जायचा.आणि मग रुबाबात बाहेर पडायचं असा तो फंडा होता.

 त्या अफगाण स्नो ची बाटली फार सुंदर दिसायचीनिळ्या रंगाची बाटली असायची आणि  त्यावर निळ्या पांढर्‍या रंगातलं हिमालयातल्या स्नोचं चित्र असायचंशालेय जीवनांतलं ते एक आकर्षण होतं. मोठ्यांकडे स्नोचा हट्ट धरला तर सपशेल नकार मिळायचा. अगदीच रडकुंडीला आलो तर गंध लावल्यासारखं गालाला स्नो लावुन आमची बोळवण व्हायची.पण त्याचा गंध आणि गारवा खुप सुखावुन जायचा.

लहानपणी हाती पडणारा अफगाण स्नो मोठा झाल्यावर मोठी बाटली खरेदी करुन मनसोक्त फासायचा असे मनांत मांडे मांंडायचोपण मोठेपणी हातात पैसे येऊ लागल्यावर मात्र त्या अफगाणा स्नो ची आठवण झाली नाहीपरवां एका मित्राबरोबर लहानपणांतल्या अप्राप्य वाटणार्‍या वस्तुंबद्दल  बोलतांना अचानक अफगाण स्नो ची आठवण झाली.आणि मग मन त्या मंतरलेल्या काळांतील आठवणींच्या मायाजालांत गुरफटुन गेलं.

 

                                                                                                                                   - हेमंत

 

Comments

  1. काय सुंदर आठवण आहे. मस्त वाटलं वाचताना. पुढच्या लिखाणाच्या प्रतीक्षेत आहे.

    ReplyDelete
  2. त्या अफगाण स्नोची ही कुळकथा. सध्याचा भाव amazon वर शंभर ग्रॅमला रुपये १,२००. मूळ किंमत रुपये ३,०००. आजही तो अप्राप्यच वाटेल.
    https://theprint.in/feature/brandma/afghan-snow-indias-first-beauty-cream-was-christened-by-a-king-and-endorsed-by-gandhi/373026/

    ReplyDelete
  3. खूप छान आहे.असाच आनंद मला २०२२ साली अमेरिकेत डालडा पाहिला तेव्हा झाला होता.

    ReplyDelete
  4. हो. ती बाटली आणि चित्र मोठं आकर्षक होतं. खरे तर मुंबईच्या दमट हवेला तो स्नो काही उपयोगाचा नव्हता. पण वास आणि त्याचा गार स्पर्श मात्र मस्त होते.

    ReplyDelete
    Replies
    1. गत जीवनातील दुर्लभ आठवणींत रमायला किती छान वाटतं , नाही कां ?

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता