युवा वाणी कार्यक्रम - आकाशवाणी
६ जानेवारी १९७४,
पोदार कॉमर्स कॉलेज मध्ये एफ वाय ला प्रवेश घेऊन सहाच महिने
लोटले होते. मराठी मिडीयम मधून आल्यामुळे हा कोर्स
आपल्याला झेपतो कि नाही अशी भीती वाटत होती. पण पहिल्या मिड टर्म मध्ये सर्व विषयात पास झालो आणि म्हटलं सुटलो.
तो अभ्यास नीट करताना काव्यलेखनाचा अभ्यास कधी सुरु झाला कळलं नाही. हा अभ्यास करता करता कविता सुचायला लागल्या. आमचे राम पटवर्धन सर मराठी गद्य पद्य वेचे शिकवत असताना कवितांचे तास जास्त आवडू लागले. पण त्या सिद्धहस्त कवींच्या कविता अतिशय उत्कृष्ट होत्या. त्यामुळे माझ्या कवितांची वही फाडून टाकायचा निर्णय घेतला परंतु वही फाडण्याधी माझा खास मित्र दीपक जोशी याला वाचायला दिली. वाचल्यावर तो म्हणाला कि एवढ्या काही वाईट नाहीत. वही फाडू नकोस. लिहीत रहा. मग माझा मित्र, माझा गुरु, माझा टीकाकार, दीपक याच्या प्रोत्साहनामुळे मी कविता लिहीतच राहिलो.
माझ्या कवितांना साभार परत यायची व्याधी जडली होती. पण दोन तीन कविता अश्वमेध मासिकात आणि नवशक्ती दैनिकात प्रसिद्ध झाल्या. पटवर्धन सरांना माझ्या कवितांमध्ये काही काव्य गुण आढल्यामुळे आमच्या कॉलेजच्या मॅगझीनमध्ये कवितांना प्रसिद्धी दिली. काही प्रथितयश कवींनी मला एका वर्षी काव्यलेखन स्पर्धेत पहिलं बक्षीस दिलं. या सर्व घडामोडीमुळे माझा माझ्या प्रतिभेवरचा विश्वास प्रचंड वाढला आणि मी मुंबई आकाशवाणी वरच्या “युवा वाणी” मध्ये कविता सादर करायचा धाडसी निर्णय घेतला. नंतर पटवर्धन सरांची शिफारस घेऊन पांच कविता युवा वाणी संचालकांकडे पाठवल्या. त्यांनाही त्या बऱ्या वाटल्या. रीतसर मला कविता वाचन करायला आकाशवाणी कडून आमंत्रण आलं.
माधुरी ताम्हाणे, अंजली खरे या कवयित्रींकडून मार्गदर्शन घेऊन मी रेकॉर्डिंगला आकाशवाणी सेन्टरला
उपस्थित झालो. माइकवर कसं बोलायचं/वाचायचं हे नीट माहित
नसल्यामुळे माझं रेकॉर्डिंग करताना त्या
रेडिओ वरच्या अधिकारी
मंडळींच्या नाकी नऊ आले. कसंबसं (कितव्या
टेक मध्ये ते आठवत नाही) माझ्या कवितांच
रेकॉर्डिंग पार पडलं.
६ जानेवारी १९७४ रोजी युवा वाणी कार्क्रमात माझं कविता वाचन प्रसारित झालं. त्या दिवशी उभ्या (हेच विशेषण कां वापरायचं) महाराष्ट्राने माझा आवाज ऐकला आणि मी धन्य झालो.
हेमंत वाईरकर

Aamhala pan ek mehfil madhe tumchi Kavita aikayla aavadel!
ReplyDeleteकविता वाचनाचा प्रयत्न आम्ही ऐकू शकलो नाही याचं वाईट वाटून आता काही उपयोग नाही पण त्या वाचायला मजा येईल हे निश्चित. तुझ्या त्यावेळच्या आणि आताच्या कवितांनासुद्धा इथे जागा मिळू दे.
ReplyDeleteसुंदर लेख. गेल्या वर्षी तू मला एक कविता पाठवली होतीस. ती इथे का टाकत नाहीस?
ReplyDeleteआनंदची सूचना बरोबर आहे. त्या वेळच्या आणि आताच्या कविता ब्लॉगवर पोस्ट कर.
ReplyDeleteकान लावून टॅन्झिस्टरवर ऐकलेली तुझ्या कवितांची युववाणी आठवते . मला वाटतं शंकर वैद्यांनी नावाजलेली तूझी " मी , खुर्ची आणि खिळा " तू वाचली होतीस .
ReplyDeleteआणि मी म्हटलं तर निमित्तमात्र होतो कारण कविता तुझ्या आडातच आहे ......... मात्र हल्ली ती पोहऱ्यात का येत नाही असा मला प्रश्न पडतो.
छान आहे अनुभव
ReplyDeleteमस्त. मी सुद्धा युववाणी मध्ये कार्यक्रम केले होते. तेव्हा तिथे निरभवणे नावाचे अधिकारी होते. मी त्यांना काय हवे विचारून मागणी तसा पुरवठा असे लिहून देत असे. तेव्हा एका वेळेला ₹२० मिळायचे. आनंद होत असे
ReplyDeleteRs २० मिळायचे
ReplyDeleteखूप छान. मी सुरुवातीची दीड दोन वर्ष म्हणजे 1971 72 असेल तीस एक कार्यक्रम केले.
ReplyDeleteपन्नास वर्षांनी 2022 साली परत एकदा आकाशवाणी चिंतन (१२) आणि वनिता मंडळ कार्यक्रम सुरू झाले.
तुस्सी ग्रेट हो
Delete