भारतातील पहिला फ्लोटिंग बँक काउंटर
एका राष्ट्रीयकृत बँकेचं अपॉइंटमेंट लेटर घरी आलं आणि मी हरखुन गेलो. बी. कॉम. झाल्यापासुन बँकेतच नोकरी करायची असं स्वप्न बघत होतो. त्यामुळे अस्मादिक खुश! त्या काळी पोस्टिंग कुठे असणार ते सेंट्रल ऑफिसला पर्सोनेल डिपार्टमेंटला गेल्यावरच कळायचं. मग पोस्टिंगच लेटर घ्यायला नरीमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये एप्रिल १९७५ मध्ये डेरेदाखल झालो.
फोर्ट
ब्रँच मध्ये तुझं पोस्टिंग असं
मला त्या पर्सोनेल ऑफिसरने
सांगितलं आणि एक एनव्हलप्
माझ्या हाती सोपवला. मी
एनव्हलप् उघडुन पाहिलं तर माझं एका
एक्सटेंशन काऊंटरवर पोस्टिंग झलं होतं, नांव
होतं I.N.S.XXX! ते वाचुन मला
काहीच अर्थबोध झाला नाही. नंतर
फोर्ट ब्रँचला गेल्यावर त्याचा उलगडा झाला.
एका
नौदलाच्या बोटीवर बँकेने काऊंटर उघडला होता आणि आम्हां
स्टाफला त्या बोटीवर जाऊन
बँकिग सेवा द्यायची होती.
हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. मी रुजु झालो
तेव्हा ती बोट डॉक
मध्ये यायची होती. ती anchorage मध्ये आल्यानंतर आमची टीम, म्हणजे
दोन क्लार्क,एक ऑफिसर आणि
एक कॅशियर, बोटीवर जाऊन काऊंटरवर जाऊन
काम करणार होती. त्या आधी फोर्ट
ब्रँचच्या सेव्हीग डिपार्टमेंट मध्ये मी ट्रेनिंग घेतलं,
माझ्या गुरु होत्या हेमा
मॅडम. त्या B.Sc. होत्या. तेव्हा मला कळलं की
पदवीचा आणि नोकरीचा काही संबंध नसतो.
शेवटी
एकदाचा तो दिवस उजाडला.
फोर्ट ब्रँचच्या कॅशव्हॅन मध्ये बसुन आमची टीम
एका बंदुकधारी गार्डबरोबर त्या डॉक कडे रवाना
झाली. सिक्युरिटी गेटवर आमची नियमाप्रमाणे तपासणी
झाली. त्या नंतर आमची
कॅशव्हॅन त्या बोटीसमोर जाऊन
उभी राहिली. "बँकवाले है" अशी आरोळी ऐकत
आम्ही त्या बोटीचं नांव
दर्शवणार्या आडव्या टाकलेल्या boarding ladder वरुन बोटींत प्रवेश केला. आम्ही मग आमच्या काऊंटरच्या
दिशेने मार्गस्थ झालो.
आमचा
काऊंटर म्हणजे एक थोडीशी मोठी
केबिन होती. त्यात छोटीशी कॅश केबिन, क्लार्कना
एक आडवा काऊंटर आणि
त्याच्या बाजुला ऑफिसरचं टेबल होतं. आम्ही
फक्त कॅश ट्रांझॅक्शन करायचो.
अकाऊंट उघडतांना ID Card वरची माहिती अकाऊंट
ओपनिंग फॉर्म वर नोंदवुन घेत होतो. त्या
दिवशी काही वेळाने लंच
टाईम झाला. टिफीनसाठी परवानगी नव्हती. त्यामुळे आम्हांला बोटीच्या "मेस" मध्ये जेवण घ्यावं लागलं.
जेवण म्हणजे इतर Sailors प्रमाणे जेवणाची थाळी घेऊन "अदबी"ने जेवण वाढणार्या
वाढप्यांपुढै उभं राहायचं. मग
थाळीत, चावल, करी (आमटी), सब्जी,
रोटी आणि कधीतरी पापड
वाढले जायचे. Sailors मंडळीत बसुन आम्ही बँकर्स जेवायचो.
जेवणानंतर
कॅश अवर्स संपले, त्या नंतर आमच्या ऑफिसरने लेजरमध्ये टाकलेल्या व्हाऊचर्स वरुन लेजर चेकिंग
करायला सुरवात केली. तो पर्यंत कॅशियरने
कॅश टॅली करुन ठेवली.
लेजर चेकिंग झाल्यावर आम्ही ती लेजर्स एका
कपाटात बंद करुन ठेवली.
नंतर ती व्हाउचर्स आणि
कॅश घेऊन बँक काऊंटर
बंद करुन बोटीच्या बाहेर
पडलो. बाहेर कॅश व्हॅन आमची वाट बघत होती.
शिरस्त्याप्रमाणे
सिक्युरीटी गेट वर तपासणी
झाली. ब्रँचमध्ये आल्यावर कॅशियर कॅश डिपार्टमेंट मध्ये
कॅश घेऊन गेला. आम्ही
क्लार्क आणि ऑफिसर आमच्या
टेबलांकडे आलो. आमच्या काऊंटरच्या
कपाटातुन लेजर्स काढली आणि त्या दिवशीची
व्हाउचर्स पोस्ट करुन चेकिंग साठी
ऑफिसरकडे दिली. व्हाऊचर्स चेकिंग झाल्यावर एक summary करुन त्यावर ऑफिसरची
सही घेऊन मग Day Book Section मध्ये नेऊन
टाकली. अशा रीतीने माझा Extension Counter I.N.S.XXX
वरचा पहिला दिवस पार पडला.
त्या
Counter ची कार्यप्रणाली अशी होती की
जेव्हा ती बोट मुंबईत
anchorage मध्ये असायची तेव्हा आमची फोर्ट ब्रँचची
टीम बोटीवर जाऊन काऊंटर चालवायची.
जेव्हा ती कोचीन मध्ये
anchorage मध्ये असायची तेव्हा आमच्या बँकेच्या कोचीन ब्रँचची टीम बोटीवर जाऊन
काऊंटर चालवायची. ती ब्रँच प्रत्येक
दिवसाची व्हाऊचर्स ची Summary आमच्या फोर्ट ब्रँचला बँकेच्या स्पेशल कुरियरने पाठवायची. त्यानुसार आम्ही फोर्ट ब्रँचला लेजर्स मध्ये पोस्टिंग करायचो. ती Summary योग्य
ती व्हाऊचर्स करुन Day Book Section मध्ये जमा करायचो. ही
system व्यवस्थित चालायची. पे-ऑर्डर, डिमांड
ड्राफ्ट वगैरे साठी आम्ही बहुतेक
फोर्ट ब्रॅचची मदत घेत होतो
की कसं ते आता आठवत नाही.
या संबंधी अधिक माहिती अशी
की त्या वेळच्या Defense Minister नी त्या वेळच्या
Finance Minister ना विनंती करुन ही Floating Bank Counter अशी कल्पना मांडली
होती आणि ती दिल्ली
दरबारी संमत झाली होती.
कल्पना
कोणाचीही असो, कोणीही ती
कार्यान्वित केलेली असो पण भारतीय
बँकिगच्या इतिहासांत ही Floating Bank Counter ची concept माझ्याच बँकेने अंमलात आणली त्या बद्दल
मला माझ्या बँकेचा अभिमान वाटायचा. तसेच नौसैनिकांना बँकिग
सेवा देण्याची संधी मिळालेल्या मलाही
देशाची अप्रत्यक्ष सेवा केल्याबद्दल स्वत:बद्दल खुप अभिमान वाटायचा
आणि वाटत राहिला आहे.
तुझी आठवण एकदम मस्त आहे आणि तुझं लिखाण सुद्धा छान आहे...👌👌👏👏🙏
ReplyDeleteज्या ठिकाणी जाण्याकरताचा वेडिंग पीरिअड एक वर्षाचा असतो (नौदल दिन निमित्ताने) तिथे तुम्ही रोज जात होता. भाग्यवान आहेस.
ReplyDeleteछान लिहिलं आहेस. You were lucky to visit the ship. I assume that you were given a tour of the ship.
ReplyDeleteखूप छान.विक्रांतचे बांगला युद्धात बरेच नुकसान झाले होते .ती मुंबईत आली होती तेव्हा माझे कॉटन कॉर्पोरेशन मधील
ReplyDeleteसाहेब ब्रिगेडियर एस एन Tripathi यांनी अर्धा दिवस बरोबर फिरून ती मला दाखविली होती.
अवाढव्य होती. जणू एखादे गावच.
Amazed to hear about floating bank for the 1st time!! 😊
ReplyDeleteVery exciting.
ReplyDeleteYou must be cherishing all those memories.
Your comments are special for me as it were in college days for my poetry
ReplyDeleteअनोखा अनुभव. माझ्या मते कुणाही बँकरला अगदी सुरवातीलाच असा
ReplyDeleteअनुभव मिळणे हे भाग्यच. मी तर ऐकलेही नव्हते.