पुन्हा एकदा कविता

फिर्याद

फिर एक बार कत्ल हुआ

पर दर्द का एहसास नही

खुदा किससे  पाला पडा है

आप को तो कुछ खबर ही नही!

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

हमदर्द

माना के ये दर्द गहरा है

लेकिन लगता सूनहरा है

पता है के ये सयाना नही

पर क्या करे हमारा अपना है!

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

निवृत्त - एक व्यथा

वयाची साठी ओलांडली की

ऑफिसला रामराम ठोकुन

चुपचाप घरी बसायचं

पदरात पडलेल्या पेन्शनवर

संथपणे गुजराण करत राहायचं

मन आणि शरीर पांगळे करणारे आजार

अटीतटीने दुर भिरकावत

गृहविष्णुच्या साच्यात

स्वत:ला ढासळवत जगत राहायचं

पुढच्या पिढीला रोबोटसारखी साथ देत

निमुटपणे (दिलेली) functions

पार पाडत राहायचं

देवालाही वेळ नसतो तुमची निवृत्तांची

गाऱ्हाणी ऐकायला........

त्याच्यापुढे प्रचंड जनसमुदाय असतो

काम करुन कौल मागणारा!

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 

निवृत्त - एक कथा

आम्ही सारेच निवृत्त

पण प्रत्येकजण आपआपल्या Time Zone मध्ये

मार्गस्थ झालेला!

आता मला पडणारे प्रश्र

त्यांना आधीच पडुन गेलेले

Solution वर स्वार होऊन  ते पुढे गेलेले .

मी मात्र वर्गातल्या मुलासारखा

जास्त जास्त अभ्यास करुन

उत्कट उत्तरं शोधणारा!

नवनीतची गाईड शाळेत गुप्तपणे

मदतीला धावायची......

आज मात्र असं गुप्तपणे, गुपचुप

मदतीला धावणारं कोणी नाही......

Comments

  1. हिंदी आणि मराठी? छान लिहिल्या आहेस. Keep it up.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार .मित्रांच्या कौतुकाने हुरूप वाढतो .

      Delete
  2. आपका शायरीका अंदाज काबिले तारिफ है. आपकी ये शायरी और कविता जो, कुछ मजबुरीयाऺ बयाॅऺ करती है फिरभी आपकी उम॒मीद बरकरार है यह भी सूचित करती है.
    आपका मुशायरा जारी रहे

    ReplyDelete
    Replies
    1. बहुत बहुत शुक्रिया

      Delete
  3. वाह हेमंत, परत कविता लिहायला लागलास हे छान झाल. रिटायरमेंटचा विषय तू पुढे आणलाच आहेस… ह्या काळात मार्गक्रमण शक, सुसह्य व्हायला कवितेतून (जगाशी असो- नसो) स्वतःशी संवाद साधायला कवितेसारखा सच्चा साथी नाही !
    छान आहेत हिंदी व मराठी कविता !
    तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा 🌷😊

    ReplyDelete
    Replies
    1. कौतुक आणि सुजाण सल्ला .आणखी काय हवं असत माझयासारख्या लेखकाला ,नाही का ?

      Delete
  4. एडिट चा पर्याय दिसला नाही. टायपिंग एरर झालाय. “शक “ ऐवजी “सहज “ असे वाचावे प्लीज 🙏

    ReplyDelete
  5. हिंदी आणि मराठी दोन्ही सुंदर!
    हमदर्द तर खासच! निवृत्तीच्या कविता एकदम पटण्यासारख्या. असेच लिहित रहा. आम्ही नक्कीच वाचून अभिप्राय देऊ.

    ReplyDelete
  6. हेमंत चारही कविता अतिशय उत्तम आहेत. तू हिंदीतही छान व्यक्त होतोयस. कडक सॅल्युट. निवृत्तीच्या कथा आणि व्यथाही उत्तम व्यक्त झाल्या आहेत.व्यथा वाचली तेव्हा वाटले तू अगतिकता का व्यक्त करतोयस ? उदासीनता प्रकर्षाने जाणवली.पण हीच तुझी खरी ताकद आहे. कथेमध्ये मात्र नेमके वास्तव स्वीकारण्याची भावना जाणवली. भिन्न भावनांना शब्दात उतरवून वाचकाला त्या आपल्याच आहेत असे वाटावे ह्यात कवीचे खरे यश असते. सुंदर

    ReplyDelete
  7. भाई ,तुमाने तो दिल खुश कर दिया !

    ReplyDelete
  8. आणखी दोन साहित्यप्रेमी म्हणाले आहेत
    दोन्ही भाषेत उत्तम कविता .मला भावल्या .
    ----श्री.सुरेश तांबडे

    Short but Sweet .
    --- श्री.जगदीश गाडगीळ

    ReplyDelete
  9. तुझ्या ह्या ब्लॉग वरील पोस्ट्स वाचते आहे..परत लिहू लागलास याचा आनंद जास्त आहे.
    तुझ्या कविता नेहमीच सुरेख आणि वेगळ्या असतात. हिंदीतील कवितेतूनही परिणामकरक व्यक्त झाला आहेस. पुढच्या पोस्टच्या प्रतीक्षेत....

    ReplyDelete
  10. माझ्याबरोबर कॉलेजमध्ये असताना आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही
    कविता लिहायला मला तु नेहमीच प्रोत्साहन दिले आहेस.बऱ्याच वेळा तुला विचारून कविता दुरुस्त करून वाचकांपुढे सादर केल्या आहेत. त्यामुळे ह्या ब्लॉगवर तुझा अभिप्राय मिळणं मला महत्वाचं वाटत होतं. तुझा अभिप्राय आत्मविश्वास दुणावणारा आणि
    आश्वस्त करणारा आहे.. मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  11. वा हेमंत,खूप छान वाटलं, निवृत्ताचं मनोगत प्रामाणिकपणे व्यक्त केलं आहेस. असाच लिहिता रहा. पहिले शेर सुद्धा ' क्या बात है ' म्हणायला लावणारे....मस्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अत्तराचा फाया!

कविता